१. अशोकांचा परिचय
२. अशोकाचे लेख
३. अशोक-काळाचे समालोचन
४. अशोकाचे 'नीतिधर्म'
५. अशोक आणि बौद्धधर्म
सम्राट अशोक जगाच्या इतिहासातील राज्यकर्त्यांच्या भाऊगर्दीत चमकून दिसणारे देदीप्यमान तारा - एच.जी. वेल्स मात्र भारताच्या प्राचीन इतिहासात या अद्वितीय राजासंबंधी जी माहिती उपलब्ध आहे ती केवळ खुद्द अशोकानेच लिहवून घेतलेल्या प्रस्तरलेख आणि स्तंभलेख. या लेखांवरून in between the lines अशा विश्लेषणातून अशोकाचं चित्र करण्याचा प्रयत्न या पुस्तकेद्वारा केला आहे. अशोकानं बौद्धधर्म स्वीकारला होता का? हा प्रश्न गौण आहे. मात्र लिहवून घेतलेल्या लेखातून अशोकाने त्याच्या प्रजाजनांना एका स्वतंत्र नीतिधर्माची शिकवण दिल्याचं जाणवतं.
तात्कालीन प्रचलित आणि आता केवळ काही अभ्यासकांनाच ज्ञात असलेली ब्राह्मी लिपी प्रकाशात आणण्याचा हा छोटासा प्रयत्न.
पर्यावरण हा आजच्या काळातील परवलीचा शब्द. मात्र संरक्षित प्राण्यांची यादी आणि त्यांच्या हत्यावरील निर्बंध यासंबंधीचे अशोकाचे परिपत्रक हे जगाच्या पर्यावरण विषयक कायद्याचा सर्वात प्राचीन लिखीत संदर्भ आहे.